नवी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उशिरा जाहीर झालेली प्रभाग रचना एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्षाचे नवे कारण ठरली आहे. महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी रात्री १११ सदस्य संख्या असलेल्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा हरकती आणि सूचना मागवण्यासाठी जाहीर केला. मात्र, ही प्रभाग रचना नियमाला धरून नसल्याच्या तक्रारी गणेश नाईक यांच्या समर्थकांनी केल्या आहेत. या आखणीत ठाण्याचा प्रभाव असल्याचा आरोप नाईक समर्थकांकडून होत आहे. यावर गणेश नाईक यांनी एका बैठकीत "हा डाव आपल्याला माहित आहे आणि मी तो उधळून लावेल" असे म्हटले आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात आरपारची लढाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात या प्रभाग रचनेवरून मोठी चर्चा सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-navi-mumbai-ward-restructuring-eknath-shinde-and-ganesh-naik-clash-over-draft-plan-sparking-major-political-conflict-ahead-of-civic-polls-1379683
0 Comments