Virar Building Collapsed : विरारमधील इमारत दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, नऊ जण गंभीर जखमी ABP MAJHA

विरारमध्ये इमारत दुर्घटनेची मोठी बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या आदल्या रात्री विरार पूर्वच्या विजय नगर परिसरात रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत तब्बल चौदा जणांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ही इमारत दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. वसई विरार महापालिकेनं या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी अलीकडेच नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस बजावण्यापूर्वीच ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर संपूर्ण वसई-विरार परिसर हादरला आहे. घटनास्थळी सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे. मलबा हटवण्याचं काम सुरू असून आणखी काही मिळते का, हे तपासले जात आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-virar-building-collapse-14-dead-9-injured-in-ramabai-apartment-accident-search-operations-underway-1380321

Post a Comment

0 Comments