<p style="text-align: justify;">नारायण राणेंच्या अटकनाट्यानंतर जनआशीर्वाद यात्रेला आज पुन्हा सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्यामधये या जन आशीर्वाद यात्रेचा शेवटचा टप्पा सुरु होणार आहे. राणेंच्या अटकेनंतर सिंधुदुर्गात जमावबंदी लागू करण्यात आली आहे, परंतु केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यात्रा सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. राणेंच्या या जन आशिर्वाद यात्रेसंदर्भात यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार यांच्याशी माझाने बातचित केली. यात्रेविषयी अधिक माहिती दिताना जठार म्हणाले कोकणाच्या विकासाच्या वादळाला शिवसेनेने थांबवू नये अशी अपेक्षा आहे. <br /><br /></p>
source https://marathi.abplive.com/videos/news/politics-jan-ashirwad-yatra-pramod-jathar-reaction-on-jan-ashirwad-yatra-abp-majha-1000711
0 Comments