<p style="text-align: justify;">ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या 18 महानगरपालिका आणि राज्यभरातील 150 नगरपंचायतींच्या निवडणुका तोंडावर आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांची उपस्थिती असेल. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह 27 नेत्यांना या बैठकीचं आमंत्रण आहे. ज्यात ओबीसी आणि मराठा नेत्यांचाही समावेश आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-raj-thackeray-absent-from-all-party-meeting-on-obc-reservation-discussions-abound-in-political-circles-1000718
0 Comments