<p>काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचं बघायला मिळत नव्हतं. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. </p> <p>दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने स्थानिकांची पुरती दाणादाण उडाली आहे. चाळीसगावातील पुरामुळे अनेक नागरिक आणि गुरं वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. नदी - नाल्यांचा प्रवाह वाढल्याने चाळीसगावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-monsoon-jalgaon-rainfall-updates-chalisgaon-affected-by-flood-abp-majha-1001310
0 Comments