रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर सध्या पोलिस यंत्रणा कामाला लागली असून ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून गुरूवारी अर्थात काल लाँग मार्च देखील काढण्यात आला होता. तसेच सध्याच्या घडीला रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी बॅरिगेटींग देखील करण्यात येत आहे.

यात्रेदरम्यान कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन होणार अशी अपेक्षा - उदय सामंत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेदरम्यान कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन होणार अशी अपेक्षा आहे . यावेळी केवळ उद्धव ठाकरेंवर टीका करणं हा उद्देश नसावा, शिवाय तो सफल देखील होणार नाही असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-narayan-rane-exclusive-at-jan-ashirwad-yatra-1000714
0 Comments