पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप आणि शिवसेना हे राजकीय दृष्ट्या वेगळे झालेले असले तरी वैचारिक दृष्ट्या आम्ही कधीही वेगळे झालेलो नाही. हिंदुत्त्वाच्या धागा आमच्या समान आहे. फक्त जे बाहेरुन आलेले लोक आहेत, त्यांना मात्र भाजप, शिवसेनेतलं हे नातं कलुशीत करायचंय, तसा त्यांचा प्रयत्न आहे, असं राऊत म्हणाले.

नारायण राणेंनी महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही असं म्हणून पश्चिम बंगालचा अपमान केल्याचं मत व्यक्त केलं. असं वक्तव्य करुन राणे यांनी पश्चिम बंगालचा आणि महाराष्ट्राचा अपमान केलाय. आधी इतिहास वाचावा आणि मग वक्तव्य करावीत. पश्चिम बंगालमधील अनेकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचं योगदान दिल्याचं सांगत राऊत यांनी राजा राममोहन रॉय यांच्यापासून अगदी ममता बॅनर्जींपर्यंतचे संदर्भ दिले. बांग्लादेशींचा भारतात जसा उच्छाद असतो तसाच घुसखोरांचा भाजपात उच्छाद असल्याचंही राऊत म्हणाले आहेत.

बाहेरुन आलेल्या लोकांनी शिवसेना भाजपामधील संबंध बिघडवल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. यापूर्वी कधीच शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले नव्हते. मात्र बाहेरुन आलेल्यांना दोन पक्षांमध्ये संघर्ष हवा असल्याने अशी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केली. बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी, बाळासाहेब आणि अडवाणी यांचे संबंध कसे होते तसेच बाळासाहेब, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे नरेंद्र मोदींसोबत कसे संबंध आहेत हे आम्हाला माहिती आहे. मात्र ज्यांना हे माहिती नाहीय तेच लोक चिखलफेक करत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-bjp-shiv-sena-are-politically-different-but-the-thread-of-hindutva-is-the-same-among-us-says-shivsena-mp-sanjay-raut-1000713
0 Comments