<p>कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका होणार असलेल्या पाच राज्यांमध्ये रॅली आणि रोड शोवर असलेली बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवलीय. या पाच राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुक आयोगाने प्रथम १५ जानेवारी आणि नंतर २२ जानेवारीपर्यंत रॅली, रोड शोवर बंदी घातली होती. तसेच घरोघरी प्रचारासाठी फक्त ५ जणांनाच परवानगी दिली होती. मात्र आता घरोघरी प्रचारासाठी १० जणांना निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. ३१ जानेवारीला पुन्हा एकदा कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निवडणुक आयोग रॅली आणि रोड शोबाबत निर्णय घेणार आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ban-on-rallies-road-shows-till-january-31-election-commission-decides-after-corona-based-cover-1027601
0 Comments