<p>आम आदमी पक्षाने गोव्यातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून ऍड. अमित पालेकर यांच्या नावाची घोषणा केलीय. बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. यावेळी आमदार आतिशी, आप गोवा संयोजक राहुल म्हांबरे, अमित यांच्या मातोश्री ज्योती आणि पत्नी रसिका पालेकर उपस्थित होत्या. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-aap-s-caste-equation-from-cm-s-candidature-kejriwal-achieved-caste-equation-in-goa-1027602
0 Comments