<a href="https://ift.tt/341Aghf Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची 23 जानेवारी रोजी जयंती असून या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसैनिकांना दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत. या निमित्ताने बऱ्याच दिवसांनंतर उद्धव ठाकरे हे पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख शिवसैनिकांना कोणता कानमंत्र देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली बाळासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभरात शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिरे आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असतो.

या निमित्ताने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काही दिवसांत जाहीर होण्याची चिन्हे आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेत भाजप विरुद्ध सत्ताधारी शिवसेना यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे विरोधकांना काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर भाजप सातत्याने टीका करत असल्याने त्याला ते प्रत्युत्तर देतात का, हे पाहावे लागेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/3rLnhsB Corona Update : राज्यात गुरूवारी 46 हजार 393 नव्या रुग्णांची भर तर 48 रुग्णांचा मृत्यू

<a href="https://ift.tt/3rEKrAJ 2022 : प्रचार रॅली, सार्वजनिक सभांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी कायम, निवडणूक आयोगाकडून आदेश जारी

भारतीय संघाने युगांडाचा केला 326 धावांनी पराभव, लागोपाठ तिसऱ्या विजयासह क्वार्टरफाइनलमध्ये धडक

<a href="https://ift.tt/3KzpKi6 Block : मध्य रेल्वेवर 14 तासांचा मेगा ब्लॉक, असं असेल रेल्वेचं वेळापत्रक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

source https://marathi.abplive.com/news/mumbai/balasaheb-thackeray-birth-anniversary-uddhav-thackeray-to-address-shivsena-workerson-1027609
0 Comments