Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Subhash Chandra Bose : सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात 'नेताजीं'चा मोलाचा वाटा

<a href="https://ift.tt/3Itl1N7 Chandra Bose : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 23 जानेवारी रोजी त्यांची जयंती आहे. नेताजींनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा निभावला. त्याच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी 2022 मध्ये सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी केली जात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा, बंगाल विभागात झाला. बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. सुभाषचंद्र बोस यांचे वडील जानकीनाथ बोस हे व्यवसायाने वकील होते आणि त्यांची आई गृहिणी होत्या.

नेताजी यांचे प्राथमिक शिक्षण कटक येथील रेवेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांचे पुढील शिक्षण कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले. यानंतर त्यांच्या पालकांनी बोस यांना भारतीय नागरी सेवेची तयारी करण्यासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात पाठवले. नेताजींनी 1920 मध्ये इंग्लंडमध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित चळवळींमध्ये सहभागी होते.

Rohit Patil : रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षात लवकरच मोठी जबाबदारी मिळणार

Rohit Patil : कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत करिष्मा घडवून आणलेल्या रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये रोहित यांची राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झालीय. कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील नगरपंचायत निकालानंतर रोहित पाटील यांचे अभिनंदन करत त्यांना पक्षातील मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे सुतोवाच केले होते.

नुकत्याच झालेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांची नगरपंचायतवर एकहाती सत्ता आली. 23 वर्षीय रोहितने राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवत या नगरपंचायत निवडणूकीत एकत्र आलेल्या विरोधकांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. या विजयाने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची विजयी सुरुवात झालीच शिवाय राष्ट्रवादी पक्षातील रोहित पाटील यांचे वजन देखील वाढलंय.

अवघ्या तेवीस वर्षाच्या रोहित पाटील यांनी कवठेमंकाळ नगर पंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत कवठेमंकाळ नगरपंचायत ची सत्ता एकहाती ताब्यात मिळवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात रोहित पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे रोहितवर राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठीच युवक अध्यक्षपदाची जबाबदार लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

आर. आर.पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्षपदाची धुरा पाच ते सहा वर्षे सांभाळलेली होती. तसेच राज्यात राष्ट्रवादीला सक्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. तासगाव, कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात आता रोहित पाटील यांच्याकडे उदयोन्मुख नेतृत्व म्हणून आता पाहिले जात आहे. आगामी विधानसभेत रोहित यांना विधानसभेचे तिकीट देऊन सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपला रोखण्याची जबाबदारी दिली जाईल. रोहित पाटील यांना राजकीय बळ मिळावे, यासाठीच त्यांच्या नावाची शिफारस युवकांच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी करण्यात आली आहे.

from maharashtra https://ift.tt/3GWh0jV
via IFTTT
0 Comments