<a href="https://ift.tt/MrSyfpX Diesel Price Today : देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात <a href="https://ift.tt/cu7Mr3d पैशांनी वाढ होणार आहे. 22 मार्चपासून देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल 101.01 रुपये प्रति लीटर तर डिझेल 92.27 रुपये प्रतिलीटर मिळणार आहे. मागील 9 दिवसातील ही आठवी इंधन दरवाढ आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशालाचा चाप बसत आहे. महगाई गगनाला भिडली असताना दुसरीकडे इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-fuel-price-hike-8-times-in-9-days-petrol-diesel-expensive-by-5-and-half-rupees-1045769
0 Comments