Mumbai - Goa Express Highway : मुंबई महामार्गावर कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी

<p>गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांचं प्रमाण यंदा अधिक असणार आहे. त्यामुळं मुंबई-गोवा महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून काही पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घातली आहे. दूध, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर, भाजीपाला आणि वैद्यकीय वापरासाठीचा प्राणवायू या वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू रहाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर पोलीस बंदोस्त तैनात करण्यात येणार आहे.खारपाडा ते पोलादपूर मार्गावर सुमारे ३०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-express-highway-heavy-vechicles-not-alllowed-1094014

Post a Comment

0 Comments