Konkan Refinery Project: रिफायनरीचे समर्थन; आमदार राजन साळवी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन, पोस्टरवर जोडे मारले

Konkan Refinery Project: बारसू-धोपेश्वर येथील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून (Konkan Refinery Project) काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी बैठक घेतल्यानंतर आता कोकणातील वातावरण तापू लागले आहे. कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला पाठिंबा दर्शवणारे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्याविरोधात स्थानिकांनी तीव्र आंदोलन केले. उद्योग मंत्री उदय सामंत हे दिशाभूल करत असून ग्रामस्थांचा रिफायनरीला विरोध असल्याचे रिफायनरी विरोधी आंदोलकांनी सांगितले. कोकणात, पर्यावरणपूरक प्रकल्प आणण्याची मागणीदेखील यावेळी स्थानिकांनी केली.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीला आमदार साळवी हजर राहिले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले. आता, त्याचे पडसाद आता कोकणातल्या रिफायनरी होणाऱ्या गावांमध्ये दिसू लागले आहेत.

साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर या भागातील महिलांनी बुधवारी संध्याकाळी एकत्र येत आंदोलन केले. आंदोलक महिलांनी राजन साळवी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले. तर फोटोवर शेण फेकून मारले. यावेळी आमदार राजन साळवी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीती कोकणचा विनाश करणारा प्रकल्प आणू देणार नसल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.

आमदार साळवींचे ट्वीट

आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना रिफायनरीबाबत दिलेले निवेदन ट्वीट केले आहे. कोकणात रिफायनरीच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक वातावरण असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारने प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून लोकांमधील गैरसमज दूर करावे असे त्यांनी म्हटले. रिफायनरीविरोधी आंदोलकांवर निशाणा साधताना त्यांनी काही समाजविघातक संस्थांनी प्रकल्पविरोधात खोटा अपप्रचार केल्याने प्रकल्पविरोधी वातावरण असल्याचे साळवी यांनी नमूद केले. स्थानिक तरुण-तरुणींना प्रशिक्षित केल्यास रिफायनरीतून उपलब्ध होणारा रोजगार हा त्यांना मिळेल. त्याशिवाय, इतरांनाही प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होईल असे म्हटले.

pic.twitter.com/P3UX47pfrF
— M L A Rajan Salvi (@MLARajanSalvi) November 23, 2022

ठाकरे गटात मतभेद?

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. पण त्याच वेळी खासदार विनायक राऊत यांनी मात्र आम्ही जनतेसोबत असं पत्र उद्योग मंत्री उदय सामंत यांना लिहिलं. मुंबईतील बैठकीकडे खासदार विनायक राऊत यांनी पाठ फिरवली. तर, आमदार साळवी आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यानंतर ठाकरे गटातील रिफायनरीच्या मुद्द्यावर असलेले अंतर्गत मतभेद हळूहळू समोर येताना दिसून येत असल्याची चर्चा होत आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/konkan-refinery-project-local-villagers-protect-against-shivsena-thackeray-faction-mla-rajan-salvi-who-favour-in-refinery-project-1123834

Post a Comment

0 Comments