Aurangabad Measles Disease Update: मुंबईत खळबळ उडवून देणाऱ्या <a title="गोवरचे " href="https://ift.tt/7IsnVZp" target="_self">गोवरचे (Measles Disease) संशयित रुग्ण आता <a title="औरंगाबाद" href="https://ift.tt/lWU7ATc" target="_self">औरंगाबाद शहरात देखील आढळून येत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. शहरातील शताब्दीनगर आणि रहेमानिया कॉलनी येथे गोवरचे 8 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या बालकांचे रक्त नमुने तपासणीसाठी मुंबई येथील हाफकिन लॅबोरेटरी येथे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी स्वतः बुधवारी या भागात जाऊन बालकांच्या तब्येतीची विचारपूस केली.

मुंबईतील गोवरची परिस्थिती पाहता राज्यात देखील आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान औरंगाबाद महापालिकेची आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. सर्दी, ताप, खोकला, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येणे यासारखी लक्षणे असलेल्या बालकांचे रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जात आहेत. शहरात गोवरचे शताब्दीनगर येथे 6 आणि रहेमानिया कॉलनी येथे 2 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे रक्त नमुने मुंबई येथील हाफकिन लॅबोरेटरीकडे पाठविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे अधिकारी डॉ. मुजीब यांच्यासह शताब्दीनगर भागात भेट देऊन संशयित रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली, असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

आरोग्य विभाग अलर्ट...

गोवरचे संशयित रुग्ण आढळून आलेल्या शताब्दीनगर आणि रहेमानिया कॉलनी येथे आशा वर्कर्सच्या माध्यमातून गोवर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक संशयित गोवर रुग्णांना जीवनसत्त्व 'अ' चे दोन डोस दिले जात आहेत. वॉर्डात विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. लसीकरण न झालेल्या बालकांची यादी करून त्यांना लस देण्याचे नियोजन केले जात आहे. सोबतच सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र देऊन गोवर रुग्णांची माहिती देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

ग्रामीण भागातही सर्वेक्षण

मुंबईत उद्रेक झालेल्या गोवर रुग्णांच्या संख्येने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर औरंगाबाद शहरात गोवर संशयित आढळून आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. ग्रामीण भागातील लसीकरण न झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी व लसीकरण करण्यासाठी सर्वेक्षण मोहिम सुरू करण्यात आली आहे.

<a title="Aurangabad: मोकाट कुत्र्यांच्या झुंडीचा महिलेवर हल्ला, दहा ते पंधरा फुटापर्यंत नेले ओढत" href="https://ift.tt/mEeh7IT" target="_self">Aurangabad: मोकाट कुत्र्यांच्या झुंडीचा महिलेवर हल्ला, दहा ते पंधरा फुटापर्यंत नेले ओढत

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-aurangabad-news-8-suspected-cases-of-measles-were-found-in-aurangabad-city-health-department-alert-1123845
0 Comments