<p>शिवसेनेच्या आमदारांकडून राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या तारखांवर तारखा समोर येतायत. भाजपच्या गोटात मात्र याबद्दल पूर्ण शांतता आहे. याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाहीये.. भाजपमधील वरिष्ठ पातळीवरच्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिलीये. मंत्रीमंडळ विस्ताराच्या कितीही तारखा शिवसेनेकडून सांगितल्या जात असल्यातरी भाजपचे नेते मात्र विस्तारावर बोलणे टाळत आहेत. केंद्रात मोदी-शाह आणि राज्यात शिंदे-फडणवीस हे चार नेते मिळून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेणार आहेत.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-state-cabinet-minister-expansion-will-be-done-after-central-cabinet-minister-marathi-news-1178454
0 Comments