Chandrapur Crime : खळबळजनक! काँग्रेस शहर अध्यक्षांच्या घरावर गोळीबार! अज्ञात आरोपी फरार, चंद्रपूरच्या घुग्गुस शहारातील घटना

Chandrapur Crime News: चंद्रपूर जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात घुग्गुस शहर काँग्रेस अध्यक्षाच्या घरावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार काँग्रेस (Congress) पक्षाचे शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर अज्ञातांनी  हा गोळीबार (Crime News) केला आहे. रविवारच्या (9 मार्च) संध्याकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोन युवकांनी घरावर गोळ्या झाडल्याची माहिती आहे. हा गोळीबार कोणी आणि कुठल्या कारणाने केला हे अद्याप कळू शकाले नाहीये. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या घटणेमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळासह परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांनी झाडल्या घरावर गोळ्या

पुढे आलेल्या माहितीनुसार, घुग्गुस शहरातील तुकडोजी महाराज नगरात राजू रेड्डी यांचे निवासस्थान आहे. दरम्यान  रविवारच्या (9 मार्च) संध्याकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोन युवकांनी घरावर गोळ्या झाडल्याची माहिती आहे. अज्ञातांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी रेड्डी यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत आढळून आली. या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला असून मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते राजू रेड्डी यांच्या निवासस्थानी एकत्र झालेत. पोलिसांनी मोठा फौज फाटा बोलावून या घटनेचा तपास सुरू केलाय, दरम्यान आरोपींच्या शोधासाठी शहरातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले जात असून या घटनेमागे राजकीय की व्यावसायिक वाद आहे याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. मात्र यातील आरोपीला शोधून काढणे हे पोलिसांपुढचे आव्हान असणार आहे.

छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह कॉमेंट विरोधात चिमूर शहर कडकडीत बंद

इन्स्टाग्राम स्टोरीवर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. 2 दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आल्यापासून चिमूर शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली होती. वाढता तणाव बघता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. दारम्यान काल ( 9 मार्च ) चिमूर बंद आयोजित करून बालाजी मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित करण्यात आला. आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तहसीलदारांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

हे ही वाचा

<a href="https://ift.tt/1v2El9J Crime : मोठी बातमी! चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सायबर गुन्हेगारांचा डल्ला; कोट्यांवधीची रक्कम लंपास

<a href="https://ift.tt/ukH9Zt5; News: पाण्याच्या टाकीत गुदमरून 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, तर 1 मजूर गंभीर जखमी; मुंबईतील खळबळजनक घटना

source https://marathi.abplive.com/crime/chandrapur-crime-news-firing-at-the-house-of-the-city-president-of-the-congress-party-incident-in-ghuggus-city-of-chandrapur-maharashtra-politics-marathi-news-1348372

Post a Comment

0 Comments