<p><strong>Maharashtra Breaking News LIVE Updates:</strong> संतोष देशमुखांच्या हत्येला आज तीन महिने पूर्ण झाले. मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे. संतोष देशमुखांना ज्या शस्त्रांनी मारलं त्याची रेखाचित्रे एसआयटीने चार्जशीटमध्ये जोडली, यात एक पांढरा पाईप, गॅसचा पाईप, वायर लावलेली मूठ , गज आणि लाकडी दांडा या पाच वस्तूंचा समावेश आहे. आज मनसेचा 19 वा वर्धापन दिन, मात्र यावेळी वर्धापन दिन सोहळा मुंबईत न होता पुण्याच्या चिंचवड येथे होणार आहे. सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-in-marathi-9th-march-2025-raj-thackeray-mns-ind-vs-nz-final-suresh-dhas-walmik-karad-dhananjay-munde-maharashtra-politics-1348209
0 Comments