आपल्या राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, राजकीय वातावरण ढवळून निघालं, आरोप-प्रत्यारोपांची राळ उडणं, शेरेबाजी करणं तर कधी व्यक्तिगत टीकेची पातळी घसरणं हे आता जणू नित्याचंच झालंय. त्यात सोशल मीडियाच्या एन्ट्रीने कहानी मे नवीन ट्विस्ट आलाय. याचा लेटेस्ट एपिसोड म्हणजे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं नवं गाणं आणि त्यातून सुरु झालेला वाद. लोकांचे प्रश्न मांडायच्या मंचावर अर्थात राज्य सरकारच्या अधिवेशनातही हाच मुद्दा अगदी अखेरच्या दिवशीही गाजला. पाहूया स्पेशल रिपोर्ट.

गेल्या आठवड्यापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत औरंगजेब कबर, कोरटकर-सोलापूरकर, खोक्या, दिशा सालियन ही प्रकरणं गाजत होती...

मात्र कुणाल कामरानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन केलं...

आणि या गाण्यानंतर कुणाल कामरानं औरंगजेब कबर, कोरटकर, दिशा सालियन या सगळ्या प्रकरणांना काहीसं मागे पाडलं..

राजकीय राड्यानंतरही, दररोज वेगळं गाणं शेअर करणारा कुणाल कामरा जेवढा सोशल मीडियावर गाजतोय....

तेवढाच, किंबहुना त्यापेक्षा किंचित जास्त अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात गाजला.....

कारण ठरलं कुणाल कामरा. आणि त्याचं गाणं माध्यमांसमोर पुन्हा सादर करणाऱ्या सुषमा अंधारेंविरोधातला हक्कभंग प्रस्ताव.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-government-politics-kunal-kamra-make-song-on-dcm-eknath-shinde-shivsena-controversy-maharashtra-1351265
0 Comments