ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 10 April 2025

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 10 April 2025

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला  थोड्याच वेळात भारतात आणणार, मुंबई आणि दिल्लीत कोठड्या सज्ज, भारतात आणल्यानंतर राणाला एनआयए मुख्यालयात नेणार

गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यात उच्चस्तरीय बैठक, राणाच्या प्रत्यार्पणानंतरच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती

महाराष्ट्रातल्या निवडणुकीत घोटाळा, गुजरातमधल्या काँग्रेसच्या अधिवेशनात मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप...तर, वक्फ सुधारणा कायदा हा संविधान, धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला, राहुल गांधींचा घणाघात..

शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर...कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय...आणखी दोन दिवस कोरटकरचा कळंबा जेलमध्येच मुक्काम राहण्याची शक्यता..

करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखेच होते, माझगाव कोर्टाचं शिक्कामोर्तब...करुणा मुंडेंना दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय कायम

मनसेनंतर मराठीसाठी ठाकरेंची शिवसेना सरसावली...उत्तर भारतीयांना देणार मराठीचे धडे,  १३ एप्रिल रोजी कांदिवलीत मराठी की पाठशाला उपक्रम राबवणार...

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-tahawwur-hussain-rana-update-1353588

Post a Comment

0 Comments