Thane News : मुंबई-नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात;  8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, 10 ते 12 जण जखमी, 3 गंभीर

Thane Accident News : मुंबईच्या भिवंडी (Bhiwandi) शहरातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात मुंबई-नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Accident News) 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती असून यात एका आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा या गावाजवळ हा अपघात घडला आहे. यातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. सध् पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, 10 ते 12 जण जखमी, 3 गंभीर

पुढे आलेल्या माहिती नुसार, खडवली येथे पिकनिकसाठी गेलेल्या भिवंडीतील कुटुंबियांचा अपघात होऊन यात 10 ते 12 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर यातील जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असून यात एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या खाजगी बस मध्ये 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर यातील बस चालक अतीवेगात असल्याने बस चालकाला अंदाज न आल्याने बस थेट उड्डाणपुलाखालील बोगद्याला धडकली आणि मोठा अपघात झाला. सध्या जखमींना भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी  दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हा अपघात 25 एप्रिलच्या रात्रीच्या सुमारास झालाय. यावेळी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख हे देखील रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी जखमींची विचारणा केलीय.

वारंवार सिक लिव्ह घेऊन कर्तव्यावरून गायब राहणाऱ्या पोलिसांना दणका

कुठलेही वैद्यकीय कागदपत्रे सादर न करता वारंवार सिक लिव्ह घेऊन कर्तव्यावरून गायब राहणाऱ्या नागपुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन मधील 3 पोलीस उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनीही कारवाई केली आहे.

नुकतेच पोलीस आयुक्तांनी अचानक एमआयडीसी पोलीस स्टेशनचा दौरा केला. तिथे आलेल्या तक्रारदारांशी संवाद साधले. तेव्हा निशा गवळी, महेश पवार व वैशाली सोळंके हे तीन पोलीस उपनिरीक्षक वारंवार सिक लिव्ह घेऊन कर्तव्यापासून दूर राहतात, अशी माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी तिघांच्या निलंबनाचे निर्देश दिले. नागपुरात सातत्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असताना पोलीस अधिकारी आवश्यक कागदपत्रे सादर न करता वारंवार सिक लिव्ह वर जात आहेत, ही गंभीर बाब आहे हे ओळखूनच पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/AelVXfr Mumbai Crime: बिल्डर गुरुनाथ चिचकरांनी डोक्यात गोळी झाडून घेण्यापूर्वी NCB सह अमित शाह अन् फडणवीसांना पत्रं लिहलं, म्हणाले, 'निष्पाप लोक अडकता कामा नये'

source https://marathi.abplive.com/news/thane-accident-news-private-bus-horrific-accident-in-bhiwandi-on-mumbai-nashik-highway-8-year-old-girl-dies-10-to-12-injured-and-3-critically-wounded-marathi-news-1356237

Post a Comment

0 Comments