ABP Majha Marathi News Headlines 7.00 AM TOP Headlines 7.00AM 04 May 2025

ABP Majha Marathi News Headlines 7.00 AM TOP Headlines 7.00AM 04 May 2025

पाकव्याप्त काश्मीरमध्ये मदरशांच्या नावाखाली दहशतवादी ट्रेनिंग सुरू असल्याचं उघड, एबीपी नेटवर्कच्या हाती धक्कादायक व्हिडीओ, पाकिस्तानी लष्करच एके ४७ रायफली चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचं उघड

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाकिस्तान रेंजर्सच्या सैनिकाला अटक, भारतीय सीमेत घुसण्याचा करत होता प्रयत्न, BSF कडून अटकेची कारवाई, सध्या चौकशी सुरू.

पहलगाम हल्लातही लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, आणि हमासचं कनेक्शन, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर ए तोयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह कसूरी आणि जैश ए मोहम्मदच्या मसूद अजहरचा भाऊ राऊफ असगर असल्याचा संशय

जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट....पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीसंदर्भात सविस्तर चर्चा तर नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठींही घेतली पंतप्रधानांची भेट

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा काश्मीरमध्येच...साथीदारांसह जंगलात लपून बसल्याची माहिती... सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू

चेन्नईतून श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोला पोहोचलेल्या विमानाची कसून चौकशी...पहलगाम हल्ल्याशी संबंधित सहा दहशतवादी विमानात असल्याची होती शक्यता...सर्च ऑपरेशनमध्ये काहीही हाती लागलं नसल्याची माहिती...

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-pak-terror-attack-1357469

Post a Comment

0 Comments