India-Pakistan Border : पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) तणावाची परिस्थिती कायम आहे. अशातच पाकिस्तानकडून सीमेवर सतत बोळीबार केल्याची घटना घडत आहे. परिणामी त्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने वेळो वेळी पाकड्यांना धडा शिकवला आहे. अशातच शनिवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूरला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केलाय. पाकिस्तानी लष्कराच्या चौकीवरून छोट्या शस्त्रांनी गोळीबार करण्यात आलाय, ज्याला भारतीय लष्कराने योग्य प्रत्युत्तर दिलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानने 24 एप्रिलच्या रात्रीपासून दररोज रात्री नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबार सुरू केलाय. तर शनिवारी सलग दाहव्या रात्री ही गोळीबारची घटना घडलीय.

सलग दाहव्या दिवशी LOC वर गोळीबार

पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय सैन्याने ३ आणि ४ मे दरम्यान रात्री नियंत्रण रेषेवरून (एलओसी) झालेल्या छोट्या शस्त्रांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले, असे भारतीय सैन्याने रविवारी सांगितले. जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही कारणाशिवाय लहान शस्त्रांनी गोळीबार केला. 25-26 एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने केलेल्या छोट्या शस्त्रांच्या गोळीबारानंतर भारतानं अतिशय प्रभावी प्रत्युत्तराचा हा सलग दहावा दिवस आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सैन्याने नमूद केले आहे की, "०३-०४ मे २०२५ च्या रात्री, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या समोरील भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवरून लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्याने तातडीने आणि प्रमाणानुसार प्रत्युत्तर दिले."

पाकिस्तानकडून चिथावणी देण्याचा प्रयत्न

नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या चौकीवरून होणारा गोळीबार हा पाकिस्तानकडून चिथावणी देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानकडून केवळ गोळीबार होत नाही, तर भारतीय सैन्याशी संबंधित विविध स्वायत्त वेबसाइटवर सायबर हल्ले करण्याचेही सतत प्रयत्न सुरू आहेत.

पाकिस्तानातील नागरिकांचा ढाल म्हणून वापर

पाकिस्तान सतत आंतरराष्ट्रीय समुदायाला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी सैन्याच्या अनेक जागा त्यांच्या लोकसंख्येच्या मध्यभागी आहेत. त्यांच्या अनेक मोर्टार पोझिशन्स लोकसंख्या असलेल्या भागात देखील आहेत. पाकिस्तान आपल्या नागरी लोकसंख्येचा ढाल म्हणून वापर करत आहे आणि अजूनही तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान जगाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की भारतीय सैन्य त्यांच्यावर गोळीबार करत आहे आणि नागरी लोकसंख्येला लक्ष्य करत आहे. किंबहुना, भारतीय सैन्याने कधीही प्रथम गोळीबार केलेला नाही. जेव्हा पाकिस्तानकडून गोळीबार होतो तेव्हा भारतीय सैन्यही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देते. सध्या दोन्ही बाजूंनी छोट्या शस्त्रांचा मारा सुरू आहे. लहान शस्त्रे म्हणजे - रायफल, कार्बाइन, एलएमजी (लाईट मशीन गन), रॉकेट लाँचरच्या माध्यमातून ही कारवाई केली जात आहे.

हे ही वाचा

<a href="https://ift.tt/RlQwbr6 Border: भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी रेंजरला अटक, बीएसएफने घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

source https://marathi.abplive.com/news/india/pakistan-army-fires-unprovoked-across-loc-on-india-pakistan-border-10th-day-indian-army-responds-pahalgam-terror-attack-jammu-and-kashmir-1357476
0 Comments