<p><strong>Maharashtra Breaking Updates: सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी भारतानं (India vs Pakistan War) आता आणखी एक पाऊल उचललं आहे. जम्मू काश्मीरमधल्या चिनाब नदीवरच्या बगलिहार धरणाचे दरवाजे भारताने बंद केले. त्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या चिनाब नदीची पाणीपातळी कमालीची खाली गेली आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाबचा मोठा भाग चिनाबवर अवलंबून आहे. त्यामुळे भारताच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान मेटाकुटीला येण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफची खुर्चीच धोक्याच असल्याचं दिसून येत आहे. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.</strong><strong> यासह राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-6th-may-2025-pahalgam-terror-attack-india-vs-pakistan-war-unseasonal-rain-maharashtra-politics-news-updates-1357772
0 Comments