<p>Maharashtra Live blog updates: नाशिक मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे. चारचाकी गाडीवर कंटेनर पलटी झाल्यान त्याखाली गाडी दबली जाऊन त्यातील दोन महिला आणि दोन पुरुष प्रवाशांचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यान कंटेनर पलटी होऊन चारचाकी गाडीवर जाऊन पडला आणि काही अंतर गाडीला फरफटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघाताची माहिती मिळता- घोटी पोलिस, महामार्ग पोलिस, टोल नाक्याच पथक घटना स्थळी दाखल झाले- क्रेनच्या सहाय्याने गाडीखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व रहिवासी मुबंईच्या अंधेरी परिसरातील होते. गुरुपौर्णिमा निमित्ताने एका मठात दर्शनासाठी आल्याची माहिती असून काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-todays-breaking-news-11-july-2025-vidhansabha-monsoon-session-weather-rain-news-maharashtra-politics-1369186
0 Comments