Sneha Katkar Quick Heal : डिजीटल अरेस्ट नेमकं काय? बचाव कसा करायचा?

Sneha Katkar Quick Heal : डिजीटल अरेस्ट नेमकं काय? बचाव कसा करायचा?
छत्रपती संभाजीनगर मध्ये फसवणुकीची धक्कादायक घटना घडली आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या AI चेहऱ्याचा वापर करत सायबर ठगांनी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 87 लाख रुपयांना लुटलं आहे. डिजीटल अरेस्ट करत या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला धमक्या दिल्याचा देखील् प्रकार घडला. मात्र डिजीटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय?, यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी सामान्यांनी काय करायला हवं आणि समजा डिजीटल अरेस्ट झालात तर काय करायला हवं ?, या संदर्भात माहिती दिली आहे. सायबर एक्सपर्ट आणि क्विक हिलच्या प्रॉडक्ट आणि स्ट्रॅटजी मॅनेजर स्नेहा काटकर यांनी... त्यांच्याशी संवाद साधलाय शिवानी पांढरे हिने...
डिजीटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय?

कॉल करणारे सायबर गुन्हेगार हे सीबीआय एजंट, आयकर अधिकारी किंवा कस्टम एजंट, ED, NCB किंवा पोलिस असल्याचं सांगतात
फोन कॉलद्वारे संपर्क करून ते तुम्हाला व्हॉट्सॲप किंवा स्काईपसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ कॉल करतात.

आर्थिक गैरव्यवहार, करचोरी किंवा इतर कायदेशीर उल्लंघनांसारख्या कारणांचा हवाला देऊन'डिजिटल अरेस्ट' वॉरंटची धमकी देतात.

फसवणूक करणारे पोलिस स्टेशनसारखे सेटअप तयार करतात जेणेकरून फोन केलेल्या व्यक्तीला त्यांच्यावर विश्वास बसावा.

वॉरंट रद्द करण्यासाठी किंवा कथित आरोपांमधून सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sneha-katkar-quick-heal-reaction-on-digital-arrest-crime-news-chhatrapati-sambhajinagar-maharashtra-news-abp-majha-1369382

Post a Comment

0 Comments