नायगावमध्ये विजेचा शॉक लागून दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, सोसायटीत बॅडमिंटन खेळताना शटल काढताना घडली दुर्घटना

Naigaon Accident News नायगाव  : नायगावच्या बीच कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत असताना विजेचा शॉक लागून 15 वर्षीय आकाश संतोष साहू या दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने साहू कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारच्या(11 जुलै) संध्याकाळी सातच्या सुमारास आकाश आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत होता. खेळादरम्यान शटल कॉक पहिल्या मजल्याच्या एका फ्लॅटजवळील खिडकीत गेला. तो शटल काढण्यासाठी आकाश वर गेला असता, तिथल्या खिडकीतून एसीच्या विद्युतप्रवाहाचा जोरदार शॉक लागून आकाश जागीच कोसळला आणि मृत झाला.

एसीमधून बाहेर पडणारा विद्युतप्रवाह इतका तीव्र कसा झाला?

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित फ्लॅटमध्ये राहणारी महिला ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर सोसायटीतील नागरिकांमध्ये संतापाचा भडका उडाला असून, अनेकांनी त्या महिलेविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही रहिवाशांनी तिला सोसायटीतून बाहेर करण्याची मागणी देखील केली आहे. घटनेचा संपूर्ण तपशील सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एसीमधून बाहेर पडणारा विद्युतप्रवाह इतका तीव्र कसा झाला आणि त्याची जबाबदारी कोणाची, याबाबत चौकशी केली जात आहे. मात्र या दुर्दैवी घटनेने परिसरात एकाच शोककळा पसरली आहे.

कल्याण पश्चिम वसंत व्हॅलीतील भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. डी मार्टच्या शेजारी सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या गोडाऊनमध्ये ही आग लागली. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवण्यात आले होते. त्यामुळे आग लागताच मोठा स्फोट झाला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. गोडाऊनमध्ये असलेल्या ज्वलनशील रसायनांच्या ड्रममुळे आग पाहता पाहता पसरली. आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या ताफ्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. फायर ब्रिगेडच्या जवानांनी युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे गोडाऊनमधील कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. सुमारे एक तास सुरू असलेल्या आगीवर शर्थीच्या प्रयत्नानंतर फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. पाण्याच्या बंबांसोबतच केमिकल आग विझवण्यासाठी विशेष फोमचा वापर करण्यात आला. आगीमुळे शेजारील इमारतींनाही धोका निर्माण झाला होता, मात्र वेळीच आग आटोक्यात आल्याने त्यांचा धोका टळला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गोडाऊन चालवणाऱ्या संबंधितांवर चौकशी सुरू केली आहे. रसायनांच्या साठवणीसाठी आवश्यक परवाने होते का, सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचीही कसून चौकशी होणार आहे.

हे ही वाचा

<a href="https://ift.tt/j2MYdpZ Cafe VIDEO : पुण्यातील गुडलक कॅफेच्या बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; व्हिडीओमधून ग्राहकाचा संताप

source https://marathi.abplive.com/news/naigaon-accident-news-10th-grade-student-died-on-the-spot-due-to-electric-shock-accident-occurred-while-playing-badminton-while-pulling-shuttlecock-1369380

Post a Comment

0 Comments