Jain Mandir Vile Parle: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले येथील जैन मंदिरावर कारवाई केल्यानंतर बदली करण्यात आलेले मुंबई महानगरपालिकेचे साहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे (Navnath Ghadge) यांची बदली रद्द करुन त्यांना सन्मानाने पुन्हा त्याच पदावर बसवण्यात यावे, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने (BMC) केली आहे. एप्रिल महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार विलेपार्ले येथील कांबळी वाडीमधील 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर (Jain Mandir) हातोडा चालवला होता. यानंतर जैन समाज संतप्त झाला होता. या कारवाईच्या विरोधात जैन समाजाने मुंबईत मोठा मोर्चा काढला होता. यानंतर पालिकेच्या के पूर्व विभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. याविषयी पालिकेतील इंजिनिअर्स युनियन आक्रमक झाली होती. परंतु, आता मुंबई उच्च न्यायालयानेच जैन मंदिराच्या पाडकामाची कारवाई योग्य ठरवल्याने ही संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे नवनाथ घाडगे यांना पुन्हा त्यांच्या पदावर नियुक्त करावे, अशी मागणी केली आहे. यावर आता पालिका आयुक्त काय निर्णय घेतात, हे बघावे लागेल.

नवनाथ घाडगे यांच्या उपप्रमुख अभियंता (स्थापत्य) पदाच्या पदोन्नतीचा ठरावही रोखून धरण्यात आला होता. हा ठराव 1 एप्रिल 2025 रोजी मंजूर झाला असला तरी त्यांची रोखून ठेवलेली पदोन्नती परत देऊन नवनाथ घाडगे यांची उपप्रमुख अभियंता पदी नियुक्ती करावी. तसेच त्यांना पुन्हा के पूर्व विभागाच्या साहाय्यक आयुक्तपदी नियुक्त करावे, अशी मागणीही पालिकेतील इंजिनिअर्स युनियनने केली आहे.

Mangalprabhat Lodha News: मंगलप्रभात लोढा यांच्या हकालपट्टीची मागणी

उच्च न्यायालयाने पालिकेची बाजू उचलून धरल्यानंतर म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशन चांगलीच आक्रमक झाली असून त्यांचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर-देशमुख यांनी थेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या तोडक कारवाई विरोधात प्रभात लोढा यांनी समाजाला भडकवण्याचं काम केल्याचा रमेश भुतेकर-देशमुख यांचा आरोप आहे.

ते मंदिर नव्हतं तर पत्रा शेड होतं. तोडक कारवाई सुरु असताना कोणी पुढे आलं नाही. उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सगळे समोर आले होते. गोपनीयतेची शपथ घेतलेला राज्यमंत्री कसं काय एका समाजाला भडकावतो? मोर्चाचं नेतृत्व कसं करू शकतो?, असा सवाल इंजिनिअर्स युनियनने केला होता.

आणखी वाचा

विलेपार्लेतील जैन मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी, महापालिका आयुक्तांचे आदेश

मराठी संस्कृतीचा बालेकिल्ला असणाऱ्या पार्ल्यात जैन समाजाच्या मोर्चामुळे पालिकेच्या अधिकाऱ्याची बदली, संजय राऊत कडाडले

विलेपार्लेमधील जैन मंदिरावर महापालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक; मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी आंदोलनस्थळी दाखल

source https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-news-jain-mandir-vile-parle-bmc-engineer-association-wants-to-reappoint-k-east-officer-navnath-ghadge-1369191
0 Comments