Mangal Prabhat Lodha on dadar kabutar khana: मुंबईतील कबुतरखान्यांवर पालिकेने कारवाई सुरु केल्यामुळे जैन समाज आक्रमक झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने नुकताच दादरचा कबुतरखाना (Kabutarkhana) पूर्णपणे बंद केला होता. याठिकाणी खायला मिळत नसल्याने कबुतरांचा मृत्यू होऊ लागल्याचे सांगत जैन समाजाने (Jain Community) आक्रमक भूमिका घेतली होती. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी या भूमिकेला पाठिंबा देत राज्य सरकारने मुंबईतील कबुतरखाने तडकाफडकी बंद करु नयेत, अशी भूमिका घेतली होती. त्यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कबुतरांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. (Pigeons in Mumbai)

कबुतरं नॉनव्हेज खात नाहीत, ते पडलेलं खात नाहीत, हे कबुतराचं वैशिष्ट्य आहे. आम्ही त्यांना मरु देणार नाही, ही आमची जबाबदारी आहे. लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. यामध्ये काहीही दुमत नाही. माझं असं मत आहे की, नॅशनल पार्क, आरे कॉलनी अशा भागांमध्ये प्राण्यांसाठी विशेष जागा राखून ठेवली आहे, तसं कबुतरांसाठीही काहीतरी सुरु झालं पाहिजे. जिथे लोकवस्ती कमी आहे, रेसकोर्स आहे, बीकेसी आहे, कोस्टल रोडवरील गार्डन्स आहेत, तिथे या कबुतरांची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, जोपर्यंत फायनल रिझल्ट होत नाही. आपण सरसकट निकाल घेतला तर देशात वाद निर्माण होईल. यामधून काहीतरी मार्ग काढला पाहिजे.

Mumbai Kabutar khana: मुंबईतील कबुतरखान्यांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद केले. मात्र, कबुतरांना खायला न मिळाल्याने कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. हे कबुतरखाने बंद करण्यावरुनच भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. एकीकडे कबुतरखाने बंद करण्याला धार्मिक संघटनांनी विरोध केलाय. तर मंत्री मंगलप्रभात लोढांनीही याच संघटनांशी मिळती जुळती भुमिका घेतल्याने मनसेने तिखट प्रतिक्रीया व्यक्त केलीय. मात्र, याप्रश्नी बैठक घेऊन मध्यम मार्ग काढण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.त्यामुळे आज कबुतरखान्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होईल, यात उच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मुंबई महापालिकेच्या कबुतरखान्यावरील कारवाईनंतर जैन समाज आणि गुजराती वर्ग नाराज झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्‍यांनी ही बैठक बोलावली आहे. मात्र, कबुतरांना खायला घालू नये, हे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Kolhapur Mahadevi: महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात चर्चा होणार

कोल्हापूरातील 'महादेवी हत्तीण' प्रकरणावर आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. वनमंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटील तसेच कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, वनसंरक्षक, जिल्हाधिकाऱ्यांची या बैठकीत उपस्थिती असणार आहे. मागील दोन दिवसांत झालेल्या बैठकीत अद्यापही कोणताही तोडगा निघालेला नाही. सोबतच, वनताराकडून देखील यासंदर्भात बोलणी सुरु करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हत्तीणीसंदर्भात जनभावना तीव्र होत आहेत. अशात, मुख्यमंत्री यासंदर्भात काय नेमका तोडगा काढतात हे बघणं महत्त्वाचं असेल.

आणखी वाचा

दादरमधील कबुतरखान्यासाठी जैन समाज एकटावला, रॅलीही काढली; आता मनसेचं प्रत्युत्तर, सांस्कृतिक दहशतवाद...

source https://marathi.abplive.com/news/mumbai/mangal-prabhat-lodha-on-dadar-kabutar-khana-jain-community-oppose-bmc-cm-devendra-fadnavis-call-meeting-1374901
0 Comments