गणेश गल्लीच्या राजाच्या गणेशोत्सवाचे यंदा ९८ वे वर्ष आहे. यावर्षी मंडळाने रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. ही प्रतिकृती चाळीस फूट उंच आणि दीडशे फूट रुंद आहे. या ठिकाणी बावीस फुटी मुंबईचा राजा गणेश भक्तांच्या दर्शनासाठी अवतरलेला आहे. "रामेश्वरम ची प्रतिकृती या ठिकाणी आम्ही उभी केलेली आहे आणि बावीस फुटी मुंबईचा राजा या ठिकाणी नव्या रूपामध्ये मुंबईतीलच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या दर्शन देण्यासाठी अवतरलेले आहेत." सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. भाविकांसाठी चोवीस तास दर्शन सुरू आहे. सुरक्षेसाठी विविध बॅरिकेड्स लावून रांगांची व्यवस्था केली आहे. यंदा गॅलरी रांग देखील सुरू केली आहे. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आणि मंडळाचे कार्यकर्ते तैनात आहेत. गेल्या वर्षी याच मंडळाने महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारली होती. पुण्याच्या दगडूशेठ मंदिरातही भाविकांनी सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी रांग लावली आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ganesh-chaturthi-mumbai-s-ganesh-gali-raja-unveils-22-foot-idol-and-grand-rameswaram-temple-replica-massive-crowds-for-24-hour-darshan-1380153
0 Comments