Ganpati visarjan 2025: अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे काल (6 सप्टेंबर 2025) अनंत चतुदर्शीला मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि अन्य परिसरात विसर्जन (Ganesh immersion 2025) पार पडले. असे असले तरी लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक अद्याप वाटेत आहे. सध्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगावच्या चौपाटीजवळ दाखल झाली आहे. लालगाबचा राजा ऑपेरा हाऊसवरुन गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झालाय. दहा किलोमीटरच्या अंतरासाठी गेल्या 18 तासांपासून हि मिरवणूक सुरु आहे. शिवाय यंदा मूर्ती विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा वापरण्यात येणार आहे.

दरम्यान, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप (Mumbai Ganpati Visarjan 2025) देण्यासाठी देशभरातून दाखल गणेश भक्तांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली असून सर्वत्र भक्तीचा महासागर बघायला मिळतो आहे. अशातच भायखळा अग्निशमन दलाचा जवानांकडून सायरन वाजवून लालबागचा राजाला अनोख्या पद्धतीने सलामी देण्यात आलीय. भायखळा परिसरात राजाच्या दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मध्यरात्री तुफान गर्दी बघायला मिळाली. मध्यरात्री मुंबई शहरात जोरदार पाऊस होऊन गेलाय. मात्र या जोरदार पावसामध्येसुद्धा गणेश भक्तांकडून मोठा उत्साहात राजाचा विसर्जन केलं जात असल्याचे चित्र आहे.

भायखळ्यात फायरब्रिगेडकडून बाप्पाला सायरन सॅल्युट

दुसरीकडे, लालबागचा राजाचं थोड्याचवेळात गिरगाव चौपाटीवर आगमन होईल. यानंतर लालबागचा राजाला विशेष तराफ्यावर बसवून खोल समुद्रात नेले जाईल आणि त्याचे विसर्जन होईल. मुंबईतील अनेक ठिकाणी अद्याप सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी आहे. मुंबईतील पवई तलावाच्या परिसरात मोठ्या गणपतींची रिघ लागली आहे. मुंबईत सध्या गणेश विसर्जनाचा सोहळा शिगेला पोहोचला असून संपूर्ण गिरगाव चौपाटीवर भक्तीचा जनसागर लोटला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त चौपाटीवर दाखल होत असून अतिशय भक्तिमय वातावरणात विसर्जनाचा हा महासोहळा इथे पार पडतोय.

दहा दिवसांच्या उत्साहानंतर बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

दहा दिवसांच्या उत्साहानंतर गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात येत आहे. गणेश भक्तांचा उत्साह दिवसभर शिगेला पोहोचलेला दिसला. सकाळपासून मुंबईतील मोठ्या गणपतींच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेश भक्तांनी गुलालाची उधळण करत ढोलताशेच्या तालावर नृत्य केले. लालबाग परिसरातून निघालेले बाप्पा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाले. गिरगाव चौपाटीवर अनेक मोठे गणपती विसर्जनासाठी दाखल झाले आहेत. दक्षिण मुंबईतील मोठे गणपती अजूनही चौपाटीच्या दिशेने येत आहेत. पावसाची उघडझाप सुरू असूनही गणेश भक्तांची गर्दी कायम आहे. पहाटेपर्यंत हा परिसर गजबजलेला राहील अशी माहिती मिळाली आहे. 18 तासांहून अधिक काळ उलटूनही भाविकांचा जल्लोष कमी झालेला नाही.

ही बातमी वाचा:

Mumbai Ganpati Visarjan 2025 : धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी

source https://marathi.abplive.com/news/lalbaugcha-raja-ganpati-visarjan-2025-siren-salute-from-fire-brigade-in-byculla-mumbai-ganpati-visarjan-2025-ananth-chaturdashi-marathi-news-1382236
0 Comments