Dhananjay Munde बीड : माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पहिल्यांदाच सध्याच्या परिस्थितीच्या सामाजिक समतेवर जाहीर भाषणातून नाराजी व्यक्त केलीय. मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नसल्याची खंत धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली. बीड (Beed News) जिल्ह्यामध्ये पोलिसांना सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? असा सवाल उपस्थित करत हे सांगायला मला लाज वाटते असं धनंजय मुंडे म्हणतायत. यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आल्याचं मुंडेंनी भाषणातून जाहीर केलं.

शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजानेच करायची का?

बीडमध्ये आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात धनंजय मुंडे बोलत होते. यापुढे बोलताना आपण सर्वांनी आपले महापुरुष बांधून घेतले असून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजानेच करायची का? असा प्रश्न उपस्थित करत इतर महापुरुषांच्या जयंती बाबत उद्गार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं.. तर अठरा पगड जाती धर्मियांसाठी उभं केल्याचं मुंडे यांनी म्हटले. दरम्यान, बऱ्याच दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय.

मांजरसुंबा घाटात अगदी सिनेस्टाईल शेतकऱ्याच्या धावत्या वाहनातून रेशीम कोषाची चोरी

बीड जवळील मांजरसुंबा घाटात धावत्या पिकअपमधून शेतकऱ्याचे दोन लाखांचे रेशीम कोष चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. सुनील कोळपकर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी रेशीम कोषाच्या 101 गोण्या घेऊन कर्नाटकाकडे निघाले होते. याच दरम्यान त्यांचे वाहन मांजरसुंबा घाटात आले असता अगदी सिनेस्टाईल चोरट्यांनी वाहनातील रेशीम कोषाच्या गोण्या लंपास केल्या आहेत. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. मात्र या घाटात वाहनधारकांना लुटण्याचे आणि चोरीचे प्रकार घडत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आणखी वाचा

Beed Crime News: शिव्या दिल्या; दुचाकीची चावी घेतली, राग आला म्हणून भोसकले, चाकू छातीत अडकला अन् मूठ बाहेर पडली, मध्यरात्रीच्या सुमारास बीडमध्ये नेमकं काय घडलं?

Ayush Komkar : गँगवॉरचा बदला घेण्यासाठी भाचा आयुष कोमकरला संपवलं; मामा वनराज आंदेकरच्या हत्येमागची स्टोरी काय?

source https://marathi.abplive.com/news/politics/dhananjay-munde-speech-in-beed-program-publicly-expressing-displeasure-over-the-current-social-inequality-situation-maharashtra-marathi-news-1382234
0 Comments