Pune Ganpati Visarjan 2025 Live Update : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! दगडूशेठ गणपतीची मिरवणुक कधी होणार सुरू? जाणून घ्या A टू Z

<p><strong>Pune Ganpati Visarjan 2025 Live :</strong> आज अनंत चतुर्दशी असल्याने राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला निरोप दिला जात आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूरसह इतर शहरांमध्ये सकाळपासूनच गणपती बाप्पांची उत्तरपूजा पार पडली. पूजा, आरती आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे.</p> <p>दरम्यान, पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.</p>

source https://marathi.abplive.com/news/pune/ganpati-visarjan-2025-live-updates-dagdusheth-pune-visarjan-maharashtra-ganesh-visarjan-live-ganeshotsav-2025-marathi-updates-1382051

Post a Comment

0 Comments