<p>मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाची धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये चावडी बैठका घेत 29 ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल मराठा बांधव जनजागृती करत आहेत. आतापर्यंत मुंबईच्या आंदोलनासाठी दहा हजार गाड्यांचं बुकिंग झाल आहे. मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेले आणि त्यावरती चलो मुंबई आशा आशयाचे बॅनर आणि पॅम्प्लेट छापण्याची प्रक्रिया सुरू आहे.</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-todays-breaking-news-11-august-2025-dadar-kabutar-khana-best-election-shivsena-mns-rain-weather-news-1376315
0 Comments