<p><strong>Maharashtra Live Blog Updates: पाण्यातला प्रवास संपताच मुंबईकरांचा आता खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेकडे एका दिवसात साडेतीनशे पेक्षा जास्त खड्ड्यांच्या ऑनलाईन तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपले असताना आता पावसाळी आजारांचा ‘ताप’ही वाढला आहे. यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 404 झाली असून मलेरियाचे 674 रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या वाढतच असून पालिका रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या 35 टक्क्यांनी वाढली आहे. या रुग्णांमध्ये निम्मी संख्या लहान मुलांची असल्याने मुंबईचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-22-august-2025-mumbai-rains-pune-nashik-maharashtra-weather-updates-raj-thackeray-uddhav-thackeray-devendra-fadnavis-eknath-shinde-ajit-pawar-maharashtra-politics-1378862
0 Comments