<p><strong>Maharashtra Live Blog Updates: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली. मात्र जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात. राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलंय. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची निवड करण्यात आली. याआधी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते. जातप्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिय सुरळीत राबवणे, मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणे आदी गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेत असणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तर राज्यभरात पावसाने सध्या विश्रांती घेतल्याचं दिसून येत आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-live-blog-updates-manoj-jarange-patil-maratha-reservation-devendra-fadnavis-eknath-shinde-ajit-pawar-raj-thackeray-maharashtra-weather-mumbai-pune-rains-maharashtra-politics-1379176
0 Comments