Amit Thackeray-Ashish Shelar :अमित ठाकरे-आशिष शेलार भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मनसेचे नेते अमित ठाकरे आज सकाळी साडे आठ वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेणार आहेत. ही भेट सकाळी नऊ वाजता आशिष शेलार यांच्या कार्यालयात निश्चित झाली आहे. गुरुवारी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर आज अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही महिन्यांपूर्वी आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीत 'मिठाचा खडा' पडल्याची चर्चा होती. त्यावेळी शेलार म्हणाले होते की, 'राज ठाकरेंशी वैयक्तिक संबंध होते, मात्र आता ते संपले.' या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून ही पहिलीच भेट मानली जात आहे. त्यामुळे या भेटीचे नेमके कारण काय, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-political-developments-amit-thackeray-meets-ashish-shelar-amid-buzz-after-raj-thackeray-s-cm-fadnavis-meeting-past-friendship-rift-resurfaces-1379185

Post a Comment

0 Comments