<p><strong>Maharashtra live blog updates:</strong> ठाणे स्थानकात थांबणाऱ्या कोकणात जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्या जर बघितल्या तर कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, कोकण विशेष एक्सप्रेस या गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासियांची प्रवास करण्याची इच्छा असते. मात्र त्याच गाड्यांना प्रचंड गर्दी ही बघायला मिळत आहे.</p> <p>गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल सुरू आहेत. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ७ वर कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधुन प्रवास करण्यासाठी रांग लावण्याऐवजी प्रवाशी आपल्या कुटुंबासह चिल्यापिल्या सह फलाटावरच बस्तान मांडून आहेत.कोकणकन्या गाडीने जाण्यासाठी प्रवाश्यांनी काल संध्याकाळ पासुन तब्बल २५ तास आधी ठाणे स्थानकात येऊन रांग लावली.पण या रांगेचाच बेरंग झाल्याचे चित्र आहे.रेल्वेने रांगेची जबाबदारी आरपीएफ कडे सोपवली आहे. मात्र प्रवाशांना सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-todays-breaking-news-24-august-2025-maharashtra-politics-rain-weather-updates-konkan-ganpati-ganesh-utsav-2025-news-in-marathi-1379433
0 Comments