Maharashtra LIVE News : 6 AM : Superfast News Update : 10 AUG 2025 : ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसचा ऑनलाइन शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहतील. ही वंदे भारत एक्सप्रेस चौदा ऑगस्टपासून नियमितपणे सुरू होणार असून, सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा आज गोंदिया शहरात पोहोचणार आहे. ओबीसींच्या जागरणासाठी ही यात्रा राज्यभरात निघणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जम्मू काश्मीर राज्यप्रमुख मनीष साहानी यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे. भारतीय सैनिकांसाठी सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही श्रीनगर इथे रक्तदान करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं भाजपशी संगनमत करत फेरफार केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी केला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर असून, एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत. दादर कबूतरखाना ट्रस्टकडून कबूतरांना धान्य घालू नये असं आवाहन करण्यात येतंय. नागपूर जिल्ह्यातील कोराडी मंदिर परिसरात झालेल्या अपघातात सतरा मजूर जखमी झाले आहेत. 'सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी दिली आहे.' लाडकी बहीण योजनेतील पैशातून फूड स्टॉल उभा केलेल्या महिलेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट दिली.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-news-vande-bharat-express-launch-eknath-shinde-s-shiv-sena-operation-tiger-manoj-jarange-patil-s-maratha-agitation-koradi-accident-updates-1376081

Post a Comment

0 Comments