<p><strong>Manoj Jarange Patil in Mumbai LIVE Updates:</strong> मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळावे, ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आझाद मैदानातील या आंदोलनाला मुंबई पोलीस (Mumbai Police) आणखी किती काळ परवानगी देतात, हे बघावे लागेल. राज्य सरकार आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. </p>
source https://marathi.abplive.com/news/mumbai/manoj-jarange-patil-azad-maidan-agitation-live-updates-maratha-reservation-in-mumbai-1380702
0 Comments