<p>Heavy Rain in Mumbai: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत आहेत. हे क्षेत्र मुंबईजवळ असल्याने त्याचा प्रभाव मंगळवारी देखील जाणवणार आहे. मंगळवारी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र बुधवारी गुजरातकडे सरकल्यानंतर पावसाचा जोर कमी होईल असं हवामान खात्याच म्हणणं आहे. मुंबईत रात्रभर पाऊस कोसळत असून आज दिवसभर अशीच परिस्थिती असणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबईतील परळच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून कामावर जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे</p>
source https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-rains-maharashtra-rain-live-updates-weather-updates-heavy-rain-alert-konkan-pune-marathwada-rain-updates-in-marathi-1378080
0 Comments