Beed Crime : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर (Santosh Deshmukh Murder Case) बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे (Beed Crime) अनेक धक्कादायक पैलू आता उघडकीस येत आहेत. जिल्ह्यात हत्या, अपहरण, लैंगिक अत्याचार, गावठी शस्त्रांचा वापर आणि किरकोळ कारणांवरून होणाऱ्या मारहाणींच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा एकदा हादरले आहे.

बीड शहरातील स्वराज्य नगर भागात चाकूने हल्ला करून एका 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येचं कारण समोर आले असून मित्रात किरकोळ वाद झाला आणि मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने हत्या केली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून बड्या शिताफीने अवघ्या काही तासांत अटक केली आहे.

किरकोळ वादातून मित्रानेच मित्राला संपवलं

याबाबत अधिक माहिती अशी की, काल मध्यरात्री दोन वाजता विजय काळे हा गणपतीच्या समोर मित्रांसोबत नृत्य करत होता. त्याने त्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला होता. मात्र थोड्याच वेळात मित्र अभिषेक गायकवाड याच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर आरोपी अभिषेकने विजयच्या छातीत धारदार शस्त्राने वार केला. त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.

सापळा रचून आरोपीला अटक

मयत विजयने पोस्ट केलेला त्याच्या नृत्याचा व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ ठरला. घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. एका डोंगराच्या परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करत बड्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे. मयत विजय काळे हा देखील गुन्हेगारी स्वरूपाचा होता, त्याच्यावर बीडसह राज्यभरात अनेक पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आणखी वाचा

Nanded Accident News: गणरायाचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू, उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली अन्...

Amravati Crime News : जुन्या वादातून भरदिवसा हत्येचा थरार; मुलासह आईची निर्घृण हत्या; अमरावतीचं तिवसा शहर हादरलं!

source https://marathi.abplive.com/news/beed/beed-crime-friend-killed-friend-over-minor-dispute-in-swarajya-nagar-area-maharashtra-marathi-news-1381679
0 Comments