Chalisgaon Flood Impact | चाळीसगावमध्ये पूर ओसरला, आता मदतीची प्रतीक्षा ABP Majha

<p>Chalisgaon Rain Update : जळगावातील चाळीसगाव तालुक्यात पावसामुळं हाहाकार माजला आहे. तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जवळपास 800 जनावरं या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाच ते सात लोकंही वाहून गेल्याची भिती आहे. अशातच आता औरंगाबाद-धुळे महामार्ग कन्नड चाळीसगाव घाटातील भयानक दृश्य समोर आली आहेत. या घाटात दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत. तर एक गाडी घाटातून खाली कोसळली असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातून वाचलेल्या लोकांनी आपला चित्तथरारक अनुभव सांगितला आहे.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-chalisgaon-flood-big-loss-in-now-flooded-people-are-waiting-for-help-1001464

Post a Comment

0 Comments